Pune : ‘वनराई’च्या वतीने ‘सरडा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

एमपीसी न्यूज – ‘वनराई’च्या वतीने  गौरांग गोवंडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यानाचा विषय ‘सरडा’ हा असून या व्याख्यानामध्ये आपल्याला भारतातील सरडे, त्यांचे अधिवास, निसर्गातील त्यांचे महत्त्व,संवर्धन-संरक्षण इत्यादी विषयांवर सखोल माहिती मिळणार आहे. शनिवार (दि. ४ जानेवारी २०२०) संध्याकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत वनराई संस्था, आदित्य रेसिडेन्सी, ४९८, पर्वती तेथे हे व्याख्यान होणार आहे.

गौरांग गोवंडे हे भारतातील पाली आणि सरडे यांवर संशोधन करत आहेत. त्यांनी आपल्या संशोधनातून पालीच्या  दोन आणि सापांच्या एका नव्या जातीचा शोध लावला आहे. आंतरराष्ट्रीय नियतकालिकात त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. जागतिक तापमानवाढीचे सरडयांच्या लोकसंख्येवर आणि त्यांच्या अधिवासावर होणारे परिणाम याबाबत सध्या ते अभ्यास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.