Talegaon Station : शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध -जी. के. थोरात

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे 'टीडीएफ'चे उमेदवार जी. के. थोरात यांच्या मावळ शाळा भेट दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे ‘टीडीएफ’चे उमेदवार जी. के. थोरात यांनी मावळ दौऱ्यामध्ये शिक्षकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जी.के.थोरात यांचा बुलंद आवाज विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आश्वासन सर्व शिक्षकांनी दिले.

याप्रसंगी त्यांनी बा.ना.राजहंस विद्यालय परंदवडी, ज्योतीबा विद्यालय बेबेड ओहोळ, संत तुकाराम माध्यमिक विद्यालय शिवणे, मार्गदर्शक छत्रपती माध्यमिक विद्यालय शिवली, पवना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पवनानगर, तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय सोमटणे आदी शाळांना भेटी देऊन शैक्षणिक समस्या जाणून घेतल्या.

यावेळेस थोरात यांचे मावळ तालुक्यातील प्रत्येक शाळेत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी पुणे शहर लोकशाही आघाडीचे सचिव संतोष थोरात, ज्येष्ठ शिक्षक नेते ठाकर, जिल्हा प्रतिनिधी खोसे, उपाध्यक्ष धनकुमार शिंदे, मुख्याध्यापक जाधव, गटकुळ, ढगे, पुंडले, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष धनोकार आदी उपस्थित होते. या दौऱ्याचे नियोजन माध्यमिक शिक्षक संघ व मावळ तालुका टीडीएफच्या वतीने करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.