Sabaigad’ Fort : राज्यातील किल्ल्यांच्या यादीत नवीन भर!गिरीप्रेमींनी शोधला ‘साबईगड’ किल्ला

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे)- कर्जत आणि पुणे येथील गिरीप्रेमींनी केलेल्या संशोधनातून खालापूर तालुक्यातील ‘साबईगड’ किल्ला शोधला आहे. हा गड फक्तधार्मिक डोंगर नसून तो गिरिदुर्ग असून त्याचा उपयोग तत्कालीन परिस्थिती टेहाळणी साठी होत असल्याचे समोर आले आहे.ह्या गिरीदुर्गाच्या संशोधनाने महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या यादीमध्ये आणखी एक भर पडलेली आहे.

काळाच्या ओघात हरवलेला साबईगड किल्ला प्रकाशित करण्याचे काम दुर्गभ्रमंती साठी गेलेल्या पुण्यातील निहार श्रोत्री, कर्जत येथील मंदार लेले, अभिजित मराठे, शर्वरीश येवले, कौस्तुभ परांजपें या सर्वानी केले. डोंगरावर साबई देवीचे मंदिर असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाल्याने ह्या तरुणांनी डोंगरावर भ्रमंती केली वत्यांना दुर्ग स्थापत्य अवशेष आढळून आले. गडावर पाण्याचे टाके असून अनेक वीरगळ आढळून आल्या आहेत. गडावरील साबई देवीच्या मंदिरापासून कोरीव पायरीमार्ग वर चिंचोळ्या होत गेलेल्या बालेकिल्ल्यावर जातो.हा गड प्रामुख्याने टेहेळणीसाठीच वापरला जात असणार असे निष्कर्ष काढण्यात आले आहे.किल्ल्यावरून आजूबाजूचे इर्शाळगड, माणिकगड,सोनगिरी,प्रबळगड,ढाकबहिरी हे किल्ले दृष्टिक्षेपास पडतात. किल्ल्यावर जाण्यासाठी तीन मार्ग आहे.त्यातील सोपी वाट हि कोलोते गावातून जाते. दुसरी माधवबाग आयुर्वेदिक केंद्रामागून वर जाते व तिसरी वाट खालापूर फाट्याजवळून जाते.

नुकतेच मुंबई येथे 19व्या गिरिमित्र संमेलनामध्ये साबईगडाच्या संशोधनाचे सादरीकरण करण्यात आले.या मोहिमेला ट्रेकक्षितीज संस्थेचे अमित सामंत, पुण्यातीलइतिहास अभ्यासक प्र.के.घाणेकर, तसेच नाशिक मधील इतिहास अभ्यासक गिरीश टाकले यांचे योगदान लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.