Today’s Horoscope 19 July 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – वार मंगळवार (Today’s Horoscope 19 July 2022)
           
              
शुभाशुभ विचार — 08 पर्यंत चांगला दिवस

 

आज विशेष — साधारण दिवस 

 

राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30

 

दिशा शूल – उत्तरेस असेल

 

आजचे नक्षत्र – उत्तराभाद्रपदा 12.12 पर्यंत नंतर रेवती

 

चंद्र राशी – मीन
—————————————-
आजचे राशिभविष्य

 

मेष – (शुभ रंग- मरून)
आज रिकामटेकड्या चर्चेत व वाद विवादात तुमचा वेळ फुकट जाईल. खर्च आवाक्‍याबाहेर जाईल महत्त्वाची कामे दुर्लक्षित होतील. काहींचा गुढ शास्त्राकडे कल राहील.

 

वृषभ – (शुभ रंग – राखाडी)
चैन करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल. उच्चशिक्षित असाल तर मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील.  छान दिवस

 

मिथुन – ( शुभ रंग- गुलाबी)
अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरूच राहील. नोकरदारांना वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकी नऊ येतील. आज व्यस्त दिवस.

 

कर्क – (शुभरंग- पिस्ता)
नोकरदारांवर आज कामाचा प्रचंड ताण राहील. आज वरिष्ठांशी नमते घ्यावे लागेल व सहकाऱ्यांशी ही जुळवून घ्यावे लागेल. मीपणा सोडलात तर बरीचशी कामे सोपी होतील.

 

सिंह – (शुभ रंग- पांढरा)
तरुणांनी कुसंगती पासून लांब रहावे.  नीतीबाह्य  वर्तन अंगाशी येईल. वाहन चालवताना शिस्त पाळणे गरजेचे आहे. सासुरवाडी करून एखादा धनलाभ होऊ शकतो.

 

कन्या – (शुभ रंग- चंदेरी)
नोकरीत वरिष्ठ खुश असतील. हाताखालच्या माणसांवर वचक राहील. आज तुम्ही काही बिकट प्रसंग सहजच सोडवाल.  वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे-फुगवे असतील.

 

तूळ – ( शुभ रंग – सोनेरी)
काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. वेळीच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या. दुकानदारांची उधारी उसनवारी वसूल होईल. हितशत्रू सक्रिय आहेत तुम्ही सतर्क राहा.

 

वृश्चिक – ( शुभ रंग – नारंगी)
महत्त्वाच्या कामास विलंब होईल बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील हाती असलेला पैसा जपून वापरा. आज प्रिय मित्रांच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

 

धनु – ( शुभ रंग- आकाशी)
कार्यक्षेत्रात तुम्हाला पूर्वीच्या अथक परिश्रमाचे फळ दृष्टिक्षेपात येईल. कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. गृहिणींना अजिबात उसंत मिळणार नाही.

 

मकर – ( शुभ रंग- निळा)
परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. आज प्रॉपर्टी खरेदी विक्री व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. कदाचित शेजाऱ्यांना तुमच्या मदतीची गरज लागेल.

 

कुंभ – (शुभ रंग- क्रीम)
अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल, त्याचप्रमाणे खर्चाचे ही विविध मार्ग खुणावतील. नाती जपायची असतील तर आज स्पष्टवक्तेपणा बाजूला ठेवून फक्त गोड गोड बोला.

 

मीन – (शुभ रंग- जांभळा)
आज आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत रहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात आपले व्यक्तिमत्व प्रभावी राहील. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.

 

 

!! शुभम भवतु!!

 

 

श्री जयंत कुलकर्णी

 

फोन ९६८९१६५४२४

 

(ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.