Sate : साते येथे चार सूत्री भात लागवडीवर भर;पावसातही कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) – मागील काही दिवसातील वरुण राजाच्या दमदार हजेरी नंतर मावळमध्ये भात लागवडीला वेग आला आहे. वडगाव जवळील साते येथे कृषी अधिकाऱ्यांनी स्वतः  (Sate) शेतामध्ये उभे राहत शेतकऱ्यांना चारसूत्री भात लागवडीचे मार्गदर्शन केले आहे.

 

Sabaigad’ Fort : राज्यातील किल्ल्यांच्या यादीत नवीन भर!गिरीप्रेमींनी शोधला ‘साबईगड’ किल्ला

 

साते येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश गणपत आगळमे यांच्या शेतावर एस.एन.गडग कृषी सहाय्यक साते,बी.जी.सोनटक्के कृषी सहाय्यक खडकाळा,डी.एस.बुचडेकृषी पर्यवेक्षक खडकाळा यांच्या मार्गदर्शनाखाली चार सूत्री पद्धतीने (Sate) भात लागवड करण्यात आली.एमपीसी न्यूज सोबत बोलताना ग्रा.पं.सदस्य मंगेश प्रकाश आगळमे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारसूत्री भातलागवड पद्धत हि दोरीच्या साहाय्याने 25 सेमी बाय 25 सेमी वर नियंत्रित लागवड केली जाते, चार चुडाच्या चौकोनात मधोमध युरिया ब्रिकेटचा हेक्टरी 168 किलो वापर केला जातो,या पद्धतीने भात उत्पादनात वाढ होते व उत्पादन शुल्क घटते.

 

 

चार सूत्री भात लागवड सर्व शेतकऱ्यांनी करावी कारण पीक व्यवस्थापन करणे सोपे जाते,भाताची रोपे ठराविक अंतरावर असल्याने हवा खेळती राहते व पुरेपूरसूर्यप्रकाश मिळतो,रोपे कमी लागतात परिणामी बियाणे कमी लागतात,खतांची बचत होते व मजूर कमी लागतात.पारंपरिक शेती पद्धती न अवलंबता शेतकऱ्यांनी आधुनिक शेती पद्धतीकडे जावे असे मत कृषी अधिकारी यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.