Chakan : चाकण इंडस्ट्रीज फेडरेशनतर्फे ‘कामगारांसाठी औद्योगिक सुरक्षा, आरोग्य, कल्याण’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज – चाकण इंडस्ट्रीज फेडरेशनतर्फे महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने कामगारांसाठी औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि कल्याण विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी चर्चासत्र, नाटिका, स्पर्धा तसेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

Hinjawadi : होर्डिंग पडल्याप्रकरणी होर्डिंग मालकावर गुन्हा दाखल

यावेळी रोहित बिराजदार, रोहिदास झावरे, सी आर पाटील, एम आर पाटील, ए डी खोत, अनिल घोगरे, संदीप लोंढे, संजय गिरी, विजय निकोले, श्री देशमुख, शिवहरी हालन, दिलीप बटवाल, एअर मार्शल प्रदीप बापट, मुकुंद पुराणिक, विनोद जैन, नरेश राठी, श्रीनिवास साळुंखे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील कामगारांमध्ये औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि कल्याणकारी योजनांचे ज्ञान वाढविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यावसायिक धोके, आपत्कालीन तयारी, कर्मचारी कल्याण यांसह विविध विषयांवर कंपन्यांना देखील मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमात विविध उद्योगांमधील सुमारे 325 कामगारांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी औद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा संचालनालयाचे संचालक एम. आर. पाटील, अतिरिक्त संचालक ए. डी. खोत यांचा निरोप समारंभ घेण्यात आला. बजाज ऑटो येथे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले.

विविध स्पर्धांमधील विजेते –
घोषवाक्य स्पर्धा –
प्रथम – विद्या सुरगुडे
द्वितीय – विष्णू घासे
तृतीय – तुषार जाधव
सांत्वन पुरस्कार – देविदास बतलवाड, प्रविण बिरनाळे, पूजा कात्रे

निबंध स्पर्धा –
प्रथम – ज्योती वाघमारे
द्वितीय – राधे शिंदे
तृतीय – सारिका पोळ
सांत्वन पुरस्कार – नागनाथ कापसे

सुरक्षा पोस्टर स्पर्धा –
प्रथम – यशवंत डिंगणेकर, अशोक गमे
द्वितीय – आकाश हगवणे, ऋतुजा चौगले
तृतीय – रविना ढोके, रोहित सुतार
सांत्वन पुरस्कार – उमाकांत कुंभार, धनाजी तांबेकर

सुरक्षा प्रश्नमंजुषा स्पर्धा –
प्रथम – संजय फसाळे
द्वितीय – मंदार जाधव
तृतीय – अनूप सिंग
सांत्वन पुरस्कार – नीलम भोर, दीपक जांभळे, संकेत कदम

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.