Yerawada news: येरवडा खुले कारागृहातील एक पोलीस हवालदार व एका खाजगी कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडले

एमपीसी न्यूज: येरवडा खुले कारागृहातील एक पोलीस हवालदार व एक खाजगी कर्मचाऱ्याला 15,000 रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी पकडलेले आहे. याबाबत 30 वर्षीय पुरुषाने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे तक्रार केली होती.

बाजीराव पाटील बाजीराव पाटील, वय  54 वर्ष, कारागृह हवालदार खुले कारागृह, येरवडा पुणे व रिहाना सय्यद, वय 48 वर्ष, कारागृह आवारातील कॅटेग मधील खाजगी  महिला कर्मचारी या आरोपींना लाच स्वीकारल्यानंतर ताब्यात घेतले आहे.

Pune News : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह फलक लावल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक

तक्रारदार हे एरोडा खुली कारागृह येथे शिक्षा भोगत असून सध्या ते संचित रजेवर आहेत. त्यांच्या रजेच्या कालावधीमध्ये ट्यान्ना बोलावून यातील आरोपी हवालदार बाजीराव पाटील यांनी तक्रारदार यांची रजा संपण्यापूर्वी जर त्याने पन्नास हजार रुपये दिले नाही तर त्याच्या गैरवर्तुणुकीचा अहवाल पाठवून त्यांना खुल्या कारागृहातून मध्यवर्ती कारागृहात पाठवले जाईल असे सांगितले व त्याच्याकडून 50 हजार रुपयेची लाचेची  मागणी केली आहे. अशी तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांना तक्रार दिली होती.

या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. कारागृह पोलीस हवालदार बाजीराव पाटील यांनी तक्रार यांच्याकडे मागणी केलेली 50 हजार रुपये लाच रक्कमेपैक्की 15000 रुपये हरियाणा सय्यद स्वीकारल्यावर त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया येरवडा परिसरात सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे ला. प्र. वि, पुणे परिक्षेत्र, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, ला. प्र. वि, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रतिबंधक विभागाने केली आहे.

शासकीय अधिकारी कर्मचारी/ लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास संपर्क करण्याचे आवाहन अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.