Pune : दागिने खरेदीच्या बहाण्याने चोरले काऊन्टरवरील फॅन्सी मंगळसूत्र
रविवार पेठेतील चंदुकाका सराफ ज्वेलर्स दुकानात घडला चोरीचा प्रकार

एमपीसी न्यूज – दागिने खरेदीच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करत अनोळखी व्यक्तीने 1 लाख 14 हजार रुपये किमतीचे फॅन्सी मंगळसूत्र चोरी करून नेले आहेत. याबाबत चंदुकाका सराफ अॅण्ड सन्स, रविवार पेठ शाखेचे प्रमुख प्रवीण गायकवाड यांनी फरासखाना पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
24 सप्टेंबर रोजी सायंकाळी दागिने खरेदीसाठी दुकानात आलेल्या अनोळखी व्यक्तीने दुकानामध्ये विक्रीसाठी दाखविण्यात आलेले सोन्याचे फॅन्सी डोरले काऊन्टरवर ठेवलेल्या ट्रे मधून सेल्स पर्सन महिलेची नजर चुकवून त्यांना नकळतपणे चोरून नेले आहेत. चोरून नेलेले दागिने 1 लाख 14 हजार रुपये किमतीचे होते. याबाबत अनोळखी व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अमोल काळे हे करत आहेत.