PCMC : इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्डमध्ये स्मार्ट सारथी अॅप देशात दुसरे, राज्यात प्रथम; ‘गव्हर्नन्स’ पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्यूज – भारत सरकारच्या (PCMC) इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्डमध्ये ‘गव्हर्नन्स’ श्रेणीत पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या स्मार्ट सारथी अॅपने देशात दुसरे स्थान पटकाविले. याबद्दल  इंदौर (मध्यप्रदेश) येथे झालेल्या कार्यक्रमात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते महापालिका आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांना सन्मान चिन्ह व पुरस्कार प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

इंदौर (मध्यप्रदेश) येथे आज ( बुधवारी) इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्ड कार्यक्रमात राज्यपाल मंगुभाई पटेल, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी, भारत सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनचे सहसचिव आणि मिशन संचालक कुणाल कुमार यांच्यासह विविध स्मार्ट सिटीचे सीईओ आदी मान्यवर उपस्थित होते.

देशभरातील 80 पात्रताधारक शहरांमधून पिंपरी-चिंचवडला “गव्हर्नन्स” पुरस्कार प्राप्त झाला आहे. पिंपरी-चिंचवडने देश (PCMC) पातळीवरील दुसरा तर राज्यात पहिल्या क्रमांकाचे यश संपादन केले. हे यश म्हणजे पिंपरी-चिंचवड शहरवासीयांसाठी एक गौरवाची बाब असून पुन्हा एकदा शहराच्या लौकीकात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पिंपरी-चिंचवड “स्मार्ट सारथी ऍप” हा एक दूरदर्शी डिजिटल उपक्रम आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी प्लॅटफॉर्मद्वारे ई-गव्हर्नन्स तसेच नागरिक सहभाग वाढविण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. सध्या सुमारे 2 लाखाहून अधिक नागरिक अॅप, वेब पोर्टल आणि सोशल मीडिया चॅनेलद्वारे संवाद साधत आहेत.

विविध उपक्रमांमध्ये नागरिकांच्या सहभागासाठी पुढाकार, उपयुक्त माहिती, महापालिकेचा ऑनलाइन कर भरणा, ऑनलाइन विवाह नोंद, जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र सुविधा, नागरवस्ती योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा, आयडीचा वापर करून नागरिकांच्या सोयीसाठी तक्रार निवारण यंत्रणा, मनपा कार्यालये सोधण्यासाठी “जीपीएस”चा वापर, आपत्कालीन वेळेत संपर्क साधण्यासाठी मदत कार्य, स्थानिक अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पुढाकार, वेबिनारचे आयोजन, मनपाच्या आरोग्य अभियानांची माहिती, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी, विकास प्रकल्पांची माहिती, ब्लॉग लेखन यासह कोविड-19 च्या प्रादुर्भावापासून नागरिकांचे संरक्षण तसेच नागरिकांच्या कल्याणासाठी या ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या दूरदर्शी लोकोपयोगी डिजिटल उपक्रमाने देशभरात आपली छाप पाडली असून या उपक्रमात सर्वत्र कौतुक होत आहे.

Chinchwad : मॉरिशस येथील रूपाजी गणू यांना संस्कृती संवर्धन पुरस्कार

स्मार्ट सिटीज मिशन नाविन्यपूर्ण “स्मार्ट सोल्यूशन्स”द्वारे शहरातील नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छ आणि टिकाऊ वातावरण आणि सुधारित जीवनमान प्रदान करून शहरी विकास पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहे. शहरी विकासात एक आदर्श बदल साध्य करण्याच्या ध्येयाकडे मिनशद्वारे महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहे.

पीसीएमसी स्मार्ट सारथी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. सध्या सुमारे 2 लाख वापरकर्ते अॅप, वेब पोर्टल आणि सोशल मीडिया चॅनेलद्वारे संवाद साधत आहेत. पिंपरी-चिंचवडने देश पातळीवरील दुसरा तर राज्यात पहिला क्रमांकाच्या पुरस्कारासाठी नाव कोरल्याने शहरवासियांसाठी ही एक गौरवाची बाब असून पुन्हा एकदा शहराच्या लौकीकात मानाचा तुरा रोवला गेल्याचे आयुक्त सिंह म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.