Chinchwad : मॉरिशस येथील रूपाजी गणू यांना संस्कृती संवर्धन पुरस्कार

एमपीसी न्यूज – मॉरिशस देशात मराठी (Chinchwad ) भाषा आणि संस्कृतीसाठी योगदान देणारे रूपाजी गणू यांना कलारंजन प्रतिष्ठानच्या वतीने ‘संस्कृती संवर्धन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा रविवारी (दि. 1 ऑक्टोबर) सकाळी दहा वाजता, समरसता गुरुकुलम, चिंचवड येथे होणार आहे.

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. यावेळी कासारवाडी येथील दत्तमंदिर ट्रस्टचे विश्वस्त विजय जगताप, शिवानंद स्वामी महाराज आदी उपस्थित राहणार आहेत.

Pune : पुण्याची वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणूक पहा ‘एमपीसी न्यूज’वर लाईव्ह

मॉरिशस या देशात बहुतांश नागरिक भारतीय मूळ वंशाचे आहेत. तिथे रूपाजी गणू हे मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धनाचे (Chinchwad ) काम करीत आहेत त्यांच्या या कामाची दखल घेत कलारंजन प्रतिष्ठानने त्यांना सन्मानित करण्याचे ठरविले आहे. पुरस्कार प्रदान केल्यानंतर त्यांच्याशी ‘मॉरिशस मधील मराठी संस्कृती’ या विषयावर मुक्त संवाद होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.