Crime News : एक महिला व सोबतच्या 8 मुलांनी एका घरातील 28,हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरला

एमपीसी न्यूज – व्यवसायातील मतभेदामुळे 9 जणांनी एका महिलेला शिवीगाळ व मारहाण (Crime News) केली व तिच्या 90 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या वस्तू चोरल्या आहेत. याबाबत नारायणन शेणबागम, (वय 38, रा. मोरेवस्ती, साने चौक, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.

 

महिला आरोपी व तिच्या सोबत असलेल्या 7-8 मुलांनी फिर्यादी यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून, घरामध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला. घरामधील रोख रक्कम, एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी व घरातील वस्तू असे एकुण 28 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरला. तो माल घेऊन जात असताना फिर्यादीने त्यांना (Crime News) अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस आरोपीने त्यांच्या हातातील चाकूने जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

 

 

तसेच त्यांना हाताबुक्क्यानी मारहाण केली. तो माल जबरदस्तीने चोरून सोबत आणलेल्या टेम्पो व रिक्षामध्ये घेऊन गेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.