Manchar News : पोंदेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात कोल्हा जखमी

एमपीसी न्यूज – आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात (Manchar News) जखमी झालेला कोल्हा बुधवारी सापडला आहे. हॆ गाव मंचर शहरापासून 25 किलोमीटर दूर आहे.

 

 

सरपंच अनिल वाळुंज म्हणाले की, बबन मांजरे हॆ सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या शेतात कामानिमित्त गेल्यावर कोणत्यातरी जखमी प्राण्याचा विव्हळण्याचा आवाज त्यांना ऐकू आला. ते आवाजाचे दिशेने गेल्यावर पाहिले की शेतातील विहिरीजवळच्या छोट्या खड्ड्यात एक कोल्हा (Manchar News) पडलेला होता. त्यांनी मला व इतर ग्रामस्थ्यांना याबाबत सांगितले.

 

Today’s Horoscope 22 July 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

आम्ही तेथे गेल्यावर पहिले की कोल्ह्याच्या पायावर कुणीतरी चावल्याचे निशाण होते. गावात व आसपासच्या गावात बिबटे फिरत असतात. त्यातील एका बिबट्याने कोल्ह्यावर हल्ला (Manchar News) करून त्याला जखमी केले असावे. आम्ही वन विभागाला याबाबत कळवले. वनपाल सोनल भालेराव म्हणाल्या की, कोल्हा सापडल्याची माहिती मिळताच वनरक्षक एस. बी. गित्ते व इतर कर्मचारी यांचे पथक पोंदेवाडीला पाठवण्यात आले. त्यांनी कोल्ह्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात नेण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.