Woman Passenger Robbed On Kasarwadi Bridge : कासारवाडीतील पुलावर महिला प्रवाशास लुटले

एमपीसी न्यूज – बस मधून प्रवास कऱणाऱ्या प्रवाशाला बस अडवून शिवीगाळ करत दुचाकी चाल व रिक्षा चालकाने लुटले आहे. हा प्रकार कासारवाडी येथील पुलावर शनिवारी (दि.5) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली.

याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चार अनोळखी इसमाविरोधात भोसरीपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nigdi News : कोयता हातात फिरवून दहशत पसरवणाऱ्या चौघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या नाशिक ते कोल्हापूर असा बस प्रवास करत होत्या यावेळी त्या कासारवाडी परिसरात आल्या असता रिक्षा व दुचाकी त्यांचा बसचा पाठलाग करत होती. कासारवाडी पुलावर येताच बस अडवण्यात आली. यावेळी बस चालक व फिर्यादी यांना आरोपींनी शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्या गळ्यातील सोडेतीन तोळ्याची 70 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी खेचून घेऊन आरोपी पसार झाले. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.