Khadki news: खडकी येथील श्रीराम मंदिर देवस्थान येथे दीपोत्सव

एमपीसी न्यूज : त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्त खडकी येथील श्रीराम मंदिर देवस्थान येथे ‘गायो विश्र्वस्य मातर’ गाय ही विश्वाची माता आहे, या संकल्पनेवर दीपोत्सव सोमवार रात्री साजरा करण्यात आला.

हजारो पणत्या प्रजल्वित करून गोरक्षक तसेच गो मातेच्या सेवेसाठी आपले जीवन, तन मन धन अर्पण करणारे श्री शिवशंकर स्वामी महाराज, तसेच खडकीतील गोरक्षक सुशील गरसुंद, प्रथमेश बेलीटकर, ओंकार बेलिटकर, योगेश बेलिटकर, राजेश हुसले, यांचा सन्मान श्रीराम मंदिर देवस्थान चे अध्यक्ष नरेंद्र बागनाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी खडकीतिल असंख्य श्रीराम भक्त उपस्थित होते. असंख्य घोषणांनी मंदिर परिसर न्हाऊन निघाला होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद पोत्रे, संजय टेकाडे, शैलेश फुलेलू, स्नेहल पृथ्वीराज, रेणुका पृथ्वीराज, , विनोद बागेलू, राकेश पटेल,सर्वजीत बागनाईक यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.