Demonetisation Effect: नोटाबंदीचे चटके आजही कष्टकऱ्यांना, सामान्यांना – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज : नोटबंदीने होणारे गंभीर परिणामाचा कसलाही विचार न करता पंतप्रधानाने केलेल्या 500 ,1000 रू.च्या नोटबंदिला आज ६ वर्षे पूर्ण झाली. काळा पैसा बाहेर आला नाही व भ्रष्टाचार कमी झाला नाही. 99.3 % नोटा रिझर्व बँकेत परत आल्या. याउलट ऊर्जा, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, व औद्योगिक क्षेत्रात मोठी बेरोजगारी वाढली, आर्थिक व्यवहार ठप्प झाले, छोटे-मोठे उद्योग बंद पडले त्यामुळे कामगारांच्या हातचे काम केले, नोटाबंदीच्या गंभीर चटके आजही कामगार व सामान्यांना बसत आहेत अशी टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली.

Pimpri news: विसापूर गडाच्या पायरी मार्गाजवळ आढळलेली शिवकालिन तोफ शिवप्रेमींकडून गडावर स्थलांतरित

नोटाबंदीच्या झळा या विषयावर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघाचे मेळाव्यात बोलत होते. यावेळी अनंत मोरे,संजय जाधव,अनिल कदम,राजेश माने,सुनीता पोतदार, कलावती पाल, अर्चना कांबळे, वहिदा शेख, लता भोर, विजया पाटील, मनीषा शिंदे, सीमा शिंदे, वैशाली इजगज आदी उपस्थित होते .

नोटाबंदींने काळा पैसा बाहेर येईल या उद्देशाने झालेली बंदी सपशेल अपयशी ठरली. रांगेत उभे राहून असंख्य निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला . रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे सांगितलं की ९९.३ % नोटा या परत बँकेत आल्या आहेत . चलनात असलेल्या नोटा पैकी १५ लाख ३१ हजार कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. याचाच अर्थ असा की अचानक व चुकीच्या पद्धतीने घेतला गेलेला निर्णयामुळे असंख्य रोजगार नष्ट झाले , हजारो छोटे – मोठे उद्योग, व्यावसाय बंद पडले. नोटाबंदीनंतर सलग तीन वर्ष बेरोजगारीचा दर ६.९ % वर पोहोचला होता. मागील काही वर्षांमधील हा दर सर्वाधिक होता एकंदरीत नोटबंदीने बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढवून सर्वसामान्यांना अडचणीत टाकले आहे,यात सामान्य जनतेची प्रचंड परवड झाली अनेकांचे जीव गेले, देशाचे झालेले नुकसान मोदी सरकार भरून देणार का हाच प्रश्न सर्वसामान्य आजही विचारत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.