Done : डोणे गावातल्या तरुणाचा भात शेतातील खड्ड्यात बुडाल्याने मृत्यू

एमपीसी न्यूज : डोणे गावातील (Done) तरुणाचा भात शेतातील खड्ड्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याचे नाव किसन बोराडे असून हि माहिती वन्यजीव रक्षक महासंस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांनी दिली आहे.

डोणे गाव हे सोमाटणे फाटा येथून अंदाजे 15 ते 16 किलोमीटर दूर आहे. याबाबत अधिक माहिती देताना गराडे म्हणाले की, “डोणे गावातील एका शेतकऱ्याने त्याच्या भात शेतातील माती विकल्याने तेथे खड्डा तयार झाला होता. ज्यामध्ये पावसाचे पाणी साचून एक डबके तयार झाले होते. गावातील चार तरुण मित्र दुपारी पोहण्यासाठी त्या डबक्यात गेले होते. त्यावेळेस त्यांच्यातील तरुण किसन बोराडे हा थोडा जास्त आत गेल्याने बुडाला. बाकीचे तीन मित्र किनार्‍यावर असल्याने ते बाहेर निघाले.”

Pimpri accident: कारच्या धडकेत तरुण जखमी

गराडे पुढे म्हणाले की, “ही घटना आज (Done) दुपारी अंदाजे दोन वाजता घडली. वन्य जीव मावळ रक्षक संस्थेच्या सदस्यांना ही घटना अंदाजे 3 ते 3.30 वाजताच्या दरम्यान कळाली. त्यानंतर लगेच आमची टीम घटनास्थळी रवाना झाली व तेथे पोहोचली.” वन्यजीव रक्षक मावळ संस्था संस्थापक अध्यक्ष निलेश संपतराव गराडे, विनय सावंत, भास्कर माळी, सत्यम सावंत, ओमकार कालेकर व संस्कार येवले यांची टीम तिथे पोहोचली. तसेच, शिवदुर्ग मित्र लोणावळाचे
सुनिल गायकवाड, अजय शेलार, प्रविण देशमुख, चंद्रकांत बोंवले व महेश म्हसने यांची टीम सुद्धा तेथे पोहोचली. या दोन्ही टीमने मिळून त्या बुडालेल्या तरुणाचा शोध घेतला. अंदाजे 30 ते 45 मिनिटानंतर गाळाच्या सहाय्याने त्या तरुणाला बाहेर काढण्यात आले. परंतु, त्याचा बुडून मृत्यू झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.