Pimpri News: विनापरवाना मांजर पाळल्यास कारवाई; ऑनलाईन परवाना मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना विनापरवाना मांजर पाळल्यास महापालिका कारवाई करणार आहे.

मांजर पाळण्यास परवाना दिल्यास त्याची माहिती संकलित करुन त्यानुसार मांजराच्या आरोग्य, उपद्रवाबाबतच्या उपाययोजना यावर नियोजन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका मांजरांना देखील ऑनलाईन परवाना देणार आहे. त्यासाठी नवीन परवान्याला 75, नुतनीकरणाला 50 आणि विलंब शुल्क 10 रुपये आकारले जाणार आहे.

Green market : चिंचवड मध्ये जलदिंडी प्रतिष्ठान आयोजित किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिवल अंतर्गत ग्रीन बाजार सुरु

मांजरांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्याची कार्यवाही तसेच उपाययोजना करण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले असून स्थायी समितीने त्यास मान्यता दिली. बेवारस, भटक्या मांजरीचे प्रमाण वाढून उपद्रव होण्यापासून रोखण्याकरिता त्यांचे संतती नियमन शस्त्रक्रिया म्हणजेच निर्बिजीकरण, लसीकरण करणे आवश्यक आहे. संतती नियमन शस्त्रक्रिया कार्यक्रम प्रभावीपणे राबवून वाढत्या मांजरींची संख्या आटोक्यात आणणे शक्य आहे. संख्या आटोक्यात आल्यावर आरोआप त्यांच्यापासून उपद्रव नियंत्रीत राहणार आहे. लसीकरण केल्याने त्यांच्यापासून होणार रोग संसर्ग साखळी खंडीत होऊन मानवी आरोग्य अबाधित राखणे शक्य होणार आहे. पशुवैद्यकीय विभागामार्फत नेहरुनगर येथे पुण्यातील कॅनाईल कंट्रोल एॅण्ड केअर ट्रस्ट या संस्थेमार्फत भटक्या, मोकाट श्वानांवर संतती नियमन शस्त्रक्रिया विनामोबदला करण्यात येत आहे. याठिकाणी कॅट वार्ड विकसित करण्याचे कामकाज चालू आहे.

या संस्थेसोबत भटक्या मांजराच्या संतती नियमन शस्त्रक्रिया करण्याबाबत पशुवैद्यकीय अधिका-यांची तोंडी चर्चा झाली. संस्थेने विनामोबदला शस्त्रक्रिया करण्यास तयारी दर्शविली आहे. संस्थेसमवेत करण्यात येणा-या करारनाम्यामध्ये विना मोबदला भटक्या मांजरावर शस्त्रक्रिया याबाबतची अट ग्राह्य धरुन करारनामा करण्यात येणार आहे. शहरातील भटक्या, मोकाट, उपद्रावक मांजरांवर पशुवैद्यकीय विभागामार्फत तसेच प्राणी कल्याण संस्था, त्यामध्ये काम करणारे स्वंयसेवक कर्मचारी यांच्यामार्फत अटकाव करुन शस्रक्रिया करण्यात येणार आहे. पुण्यातील कॅनाईल कंट्रोल एॅण्ड केअर ट्रस्ट या संस्थेच्या ताब्यात देवून विनामोबदला शस्रक्रिया केली जाणार आहे.

मांजर पाळण्यास परवाना देतानाच्या अटी-शर्ती!

  • नवीन परवाना देण्यासाठी 75 रुपये शुल्क, नुतनीकरणासाठी 50 आणि विलंब शुल्क 10 रुपये असणार
  • परवान्याची कायदेशीर मुदत एक वर्षांपर्यंत असून तो दरवर्षी नुतनीकरण करणे बंधनकारक
  • परवाना सोबत बाळगणे आवश्यक, महापालिका आयुक्त किंवा त्यांनी नेमणूक केलेल्या प्राधिकृत अधिका-याने मागणी करताच सादर करणे आवश्यक
  • मांजरास रेबीज लसीकरण बंधनकारक राहील
  • परवाना धारकाना सार्वजनिक ठिकाणी मांजर मोकळे सोडू नये
  • मांजरापासून कोणाला दुखापत होणार नाही याची दक्षता घ्यावी
  • आरोग्य, पर्यावरणाच्या दृष्टीने मांजरामुळे कुठल्याही प्रकारची घाण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी
  • मांजरापासून कोणत्याही प्रकाराचा उपद्रव होणार नाही याची दक्षता घ्यावी
  • कोणत्याही व्यक्तीने परवाना प्राप्त केल्याशिवाय मांजर पाळू नये, परवाना घेतला असेल, त्याचे नुतनीकरण केले नसल्यास विनापरवाना मांजर पाळले आहे असे समजून नियमानुसार कारवाई

परवाना घेतल्यानंतर मानवी आरोग्यास, सार्वजनिक स्वच्छतेच्या कारणावरुन तक्रारी प्राप्त झाल्यास कारवाई केली जाईल. परवाना रद्द करण्याचे अधिकार महापालिकेने रोखून ठेवले आहेत. या अटी-शर्तीस अधीन राहून मांजरास ऑनलाईन पद्धतीने परवाना देण्यात येणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.