Pimpri accident: मोटरसायकलच्या धडकेत इसम गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : पिंपरी येथे (Pimpri accident) झालेल्या मोटरसायकलच्या धडकेत एक इसम गंभीररित्या जखमी झाला आहे.  संबधित इसमाला वाय. सी. एम हॅास्पिटल पिंपरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  तर, अज्ञात मोटर सायकलस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिके समोरील एच. डी. एफ. सी. बँकेजवळील रस्त्यावर पुणे – मुंबई महामार्गवर 30 जूनला दोन मोटरसायकल एकमेकांना धडकून अपघात झाला. या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. याबाबत राहुल तुरुकमारे (वय 32 वर्षे, रा. बोरगेवाडा पुनवळे) यांनी फिर्याद दिली आहे.

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकियेस सुरुवात

फिर्यादी हे त्यांच्या मोटर सायकल वरून जात असताना त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या ऍक्टिव्हा (एम एच 12 के एच 9814) गाडी वरील अज्ञात इसमाने मागून फिर्यादी यांच्या गाडीला जोरात धडक देऊन पलायन केले. त्या धडकेमध्ये फिर्यादी हे खाली पडून त्यांच्या गुप्तांगातून रक्तसराव होऊ लागल्याने वाय. सीए. एम हॉस्पीटल पिंपरी येथे उपचारासाठी ऍडमिट केले आहे.

तर, अज्ञात (Pimpri accident) मोटरसायकलस्वाराविरोधात भा. द. वि. कलम 279, 337, मोटर वाहन कायदा कलम 184/177, 119/177, 132(1)(क)/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.