Alandi Crime : टेम्पोचे नुकसान करत तिघांनी केली टेम्पोचालकास मारहाण

एमपीसी न्यूज : आळंदीत टेम्पो (Alandi Crime) तोडफोड व मारहाण करून जखमी केल्याप्रकारणी एकास अटक करण्यात आली आहे. याबाबत शाम खंदारे (वय 25 वर्षे, रा. तापकीरनगर, देहू फाटा, आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे. ऋषिकेश पोद्दार (वय 25 वर्षे, पत्ता माहित नाही) याला अटक करण्यात आली आहे. दोन अनोळखी इसम देखील आरोपी आहेत.

फिर्यादी 30 जूनला दुपारी घरी झोपले असताना, आरोपी पोद्दार व त्याच्या सोबत आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या घराजवळ त्यांचा टेम्पो दगडाने फोडला. फिर्यादीने असे करू नको म्हणून समजूत घातली असता, त्याने फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण (Alandi Crime) केली. तसेच, पोद्दारने त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीवर वार करून जखमी केले.

Chakan Crime : शेतातली खांब उचलले म्हणून तिघांनी केली शेतकऱ्याला जबर मारहाण

आरोपींवर भा. द. वि. कलम 323, 324, 504, 506, 427 आर्म ऍक्ट कलम 4, 25, महाराष्ट्र पोलीस अधिनियम काम 135 सह 37(1) अन्वये दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.