Chakan theft : चाकण येथून एक लाख रुपयांची ताब्यांची तार व पॉली कॅब वायर चोरीला

एमपीसी न्यूज चाकण येथे एका विद्युत रोहित्रातून सुमारे एक लाख रुपयांची तांब्याची तार व पॉलीकॅब वायर चोरीला गेली आहे. हा प्रकार 3 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आला.(Chakan theft) याप्रकरणी बुधवारी (दि.9) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

मुनावर कासमभाई तांबोळी (वय 47 रा.कोंढवा) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Green market : चिंचवड मध्ये जलदिंडी प्रतिष्ठान आयोजित किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिवल अंतर्गत ग्रीन बाजार सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कंत्राट दार असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाकण येथील एकता नगर येथील जमीन गट क्रमांक 369/1 मधील विद्यूत रोहीत्रातील (Chakan theft) 60 हजार रुपयांची तांब्याची तार व 55 हजार रुपयांची पॉलीकॅब वायर असे एकूण 1 लाख 15 हजार रुपयांचे सामान अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.