Alndi : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखपदी अ‍ॅड.विकास ढगे यांची नियुक्ती

आषाढीवारीच्या अनुषंगाने आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांना 3 महिने मुदतवाढ

आळंदी – आषाढीवारीच्या अनुषंगाने श्री क्षेत्र आळंदी (Alandi) येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या 3 विश्वस्तांना विश्वस्त पदासाठी 3 महिने मुदतवाढ पुणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दिली.

तसेच, यंदा पालखी सोहळ्याचे प्रमुख म्हणून अ‍ॅड.विकास ढगे यांची नियुक्ती झाल्याचे विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले.

Ashadhi Wari 2023 : आषाढीवारी हरितवारी करण्याच्या दृष्टीने महापालिकेचे नियोजन

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख यांचा 16 मे पर्यंत विश्वस्तपदाचा कार्यकाळ होता. परंतु, अवघ्या पंचवीस दिवसांवर आषाढी (Alandi)  पायी वारी सोहळा येऊन ठेपला आहे.

या दरम्यान विश्वस्त पदे रिक्त असणे अडचणीचे ठरणारे होते. या हेतूने सध्याच्या विश्वस्तांना मुदत वाढ मिळाली आहे. या तीन विश्वस्तांना मुदत वाढ मिळाल्याने त्यांच्या देखरेखी खाली हा पायी वारी सोहळा पार पडणार आहे.

Pune : पीएमआरडीएच्या 1 हजार 926 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.