Ashadhi Wari 2023 : आषाढीवारी हरितवारी करण्याच्या दृष्टीने महापालिकेचे नियोजन

एमपीसी न्यूज – आषाढीवारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या ( Ashadhi Wari 2023) वतीने स्थापत्य, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्थेबरोबरच यंदाची वारी पर्यावरणपूरक,प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने संबंधित विभागांना तातडीने कामकाम करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या जून महिन्याच्या आषाढीवारी पालखी सोहळा सन 2023 च्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने वारक-यांकरिता पुरविण्यात येणा-या विविध सेवासुविधांचे आणि इतर नियोजन करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त वाघ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अतिरिक्त प्रदीप जांभळे पाटील आणि उल्हास जगताप यांच्या विशेष उपस्थितीत दोन्ही संस्थानांच्या विश्वस्तांबरोबर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महापालिकेने तयार केलेल्या कृती आराखड्याचे सादरीकरणानंतर मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त वाघ बोलत होते.

पोलीस उप आयुक्त विवेक पाटील, उप आयुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक पोलीस ( Ashadhi Wari 2023) आयुक्त श्रीकांत दिसले, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त प्रशांत लायगुडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन पवन नव्हाडे, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थाचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे पाटील, उत्तम माने, जगदगुरू संत तुकाराम महाराज संस्थांचे विश्वस्त माणिक मोरे, पालखी सोहळा प्रमुख अनिल मोरे, भानुदास मोरे,संजय मोरे, विठ्ठल मंदिर आकुर्डीचे विश्वस्त माजी नगरसेवक गुलाब कुटे, प्रमोद कुटे,बाळासाहेब कुटे आदी उपस्थित होते.

बैठकीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज संस्थान कमिटीच्या वतीने विश्वस्तांनी विविध सूचना केल्या. त्यामध्ये महापालिकेच्या वतीने महापालिका कर्मचारी आणि वारकरी प्रतिनिधी असा संयुक्त स्वागत कक्ष उभारला जावा. जेणेकरून वारकरी दिंडी प्रमुखांना संपर्क साधणे सोईस्कर होईल ,पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय करावी, रस्त्यातील अतिक्रमणे दूर करावीत, पोलीस बंदोबस्तात वाढ व्हावी, पालखी मार्गावर देशी वृक्षांची लागवड करावी, सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढवावी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, कार्डियाक ॲम्बुलन्सची सोय करावी, स्वागत कमानीवरील रंगरंगोटी व दिव्यांची दुरूस्ती करावी, वारकऱ्यांचे भिंतीचित्र खराब झाले आहे.

Pune : हर घर सावरकर समिती तर्फे रायगडावर शिवरायांच्या आरतीची मानवंदना

त्यात सुधारणा करावी, स्नान पाण्याचे नियोजन करणे, पालखी पहाटे मार्गस्थ होत असल्याने रस्त्यावरील लाईट साडेसात पर्यंत चालू ठेवावे, पुरेशा टँकर पुरवठा आदी सूचना केल्या. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सूचनांबाबतीत पालखी मार्गाचे पाहणी करून योग्य नियोजन करण्यात येईल तसेच लवकरच याबाबत आयुक्त तथा प्रशासक यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आढावा बैठक घेण्यात येईल असे सांगितले.

पोलीस उप आयुक्त विवेक पाटील यांनी विविध पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांकडून बैठकीत माहिती घेऊन आढावा घेतला आणि पालखी दरम्यान योग्य बंदोबस्त आणि उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दोन्ही पालखीच्या प्रस्थानांच्या अनुषंगाने वाहतूकीत बदल करण्याबाबत सूचना देण्यात येतील. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही त्यास महापालिकेने प्रसिद्धी द्यावी असे सांगितले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तसेच अन्न व औषध प्रशासन प्रतिनिधींनी पालखी दरम्यान योग्य ती दक्षता व व्यवस्था करण्यात येईल असे बैठकीत सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.