Pune : हर घर सावरकर समिती तर्फे रायगडावर शिवरायांना मानवंदना

एमपीसी न्यूज : पुण्यातील ‘हर घर सावरकर’ समिती तर्फे 21 मे रोजी (Pune) रायगडवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित शिवराय आरतीने मानवंदना करण्यात येणार आहे. यंदाच्या सावरकर जयंती निमित्त ‘हर घर सावरकर’ समिती तर्फे 75 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवरायांवर अनेक पोवाडे रचण्यात आले आहेत. परंतु, त्यांच्यावर केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीच आरती रचली आहे. त्यामुळे 21 मे रोजी शिवरायांच्या या आरतीने मानवंदना देण्यात येणार आहे. यासाठी शिवप्रेमी आणि सावरकर प्रेमीना येण्याचे आवाहन या समितीने केले आहे.

Pune : बाणेरमधील विविध विकासकामांसाठी पालकमंत्री आग्रही

एवढेच नव्हे तर समितीतर्फे येण्या-जाण्याचा खर्च करण्यात येणार असून जेवणाचाही खर्च करण्यात येणार आहे. येणाऱ्या प्रत्येकाला एक टीशर्ट देण्यात येणार आहे. 20 मे रोजी रात्री निघून 21 मे ला परतीचा प्रवास होणार असल्याची माहिती समितीने दिली आहे.

या कार्यक्रमाला महाडचे आमदार भरत गोगावले तसेच इतिहास अभ्यासक मोहन शेटे उपस्थित असणार आहेत. प्रत्येक सहभागी गिर्यारोहकाला आमदार गोगावले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक मिळणार असल्याचे म्हंटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.