Pimpri News : खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावरील हल्ल्याचा निषेधार्थ एमआयएमकडून निदर्शने

एमपीसी न्यूज – एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गुरुवारी उत्तरप्रदेशमध्ये गोळ्या झाडत झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर एमआयएमकडून निदर्शने करण्यात आली.

पिंपरीत एमआयएमचे प्रदेश महासचिव अकील मुजावर, शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात शफिउल्ला काझी, अब्दुल रोफ कुरेशी, खालिद मुजावर, पुणे जिल्हाध्यक्ष फैयाज शेख, महिला शहराध्यक्ष रुहीनाज शेख, महासचिव मौलाना अब्दुल शंकर खान, अर्चना परब, करीम खान, अरिफ मणियार, संपर्क प्रमुख शब्बीर शेख, भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे ,सचिव फिरोज तांबोळी , भोसरी विधानसभा उपाध्यक्ष अकिब शेख ,एमआयएम रिक्षा चालक संघटना जिल्हाध्यक्ष बाबा सय्यद, मेहमूद शेख, राहील खान, नियाज देसाई, मोहतसेंन सिद्दीकी ,वसीम तांबोळी ,असिफ तांबोळी ,समीर तांबोळी , आकाश फवारी ,जमालुद्दीन शेख ,मौलाना मोईन मुलांनी , गाझी शेख आदी सहभागी झाले होते.

असदुद्दीन ओवैसी साहेब यांच्यावर झालेला प्राणघातक गोळीबार हा केंद्र, उत्तरप्रदेश सरकार देशात शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरल्याचे चिन्ह आहे. केंद्र सरकारने तात्काळ उच्च दर्जाची झेड प्लस सुरक्षा द्यावी. ओवेसी साहेब यांच्या जीवितास काहीही झाल्यास यास जबाबदार केंद्र सरकार असेल. पुन्हा अशी घटना घडल्यास ओवेसी समर्थक शांत बसणार नाही असे शहराध्यक्ष धम्मराज साळवे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.