Ajit Pawar : कालवा समितीच्या बैठकीला अजित पवार गैरहजर

एमपीसी न्यूज : पुणे शहर आणि ग्रामीण भागातील (Ajit Pawar) पाणी नियोजनाबाबत कालवा समितीची व्हीआयपी सर्किट हाऊस येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बारा वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील उपस्थित राहणार होते.

त्यामुळे जिल्ह्यातील आमदार आणि अधिकारी वेळेच्या अगोदरच बैठकीच्या ठिकाणी उपस्थित होते. त्याच बरोबर अजित पवार हे नेहमीच कोणताही कार्यक्रम किंवा बैठक असो ते वेळेच्या अगोदर उपस्थित असतात. ते लक्षात घेता भारती विद्यापीठ येथील कार्यक्रम वेळेत आटोपून चंद्रकांत पाटील हे व्हीआयपी सर्किट हाऊस येथे अकरा वाजून चाळीस मिनिटाला आले.

त्यावेळी गाडीचा दरवाजा उघडताच समोर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना चंद्रकांत पाटील यांनी विचारले विचारले की, अजितदादा आले का? अजितदादा नाही आले. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी अजितदादासाठी धावपळत आलो आहे. अजितदादा आज पुन्हा गायब झाले की काय अस मिश्किलपणे म्हणताच एकच हशा पिकला.

त्यानंतर चंद्रकांत पाटील हे बैठकीच्या ठिकाणी रवाना झाले. त्यानंतर काही वेळाने कालवा समितीच्या बैठकीला सुरुवात झाल्यावर बराच वेळ झाल्यावर देखील अजित पवार बैठकीच्या ठिकाणी (Ajit Pawar) आले नाही. त्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल का अशी चर्चा पुन्हा सुरू झाली.

सर्किट हाऊस येथे बुधवारी अकरा वाजता कालवा समितीची बैठक जिल्ह्यातील आमदार आणि अधिकारी वर्गाला देण्यात आली होती. तसेच अजित पवार यांच्या कार्यालयास देखील कळविण्यात आले होते. त्या बैठकीच्या वेळेनुसार अजित पवार यांनी आजच्या दिवसभरातील कार्यक्रमाच नियोजन करण्यात केले होते.

Akurdi : मराठा आरक्षणासाठी 6 मे रोजी एल्गार परिषद

मात्र, काल अचानकपणे हीच बैठक बारा वाजता आयोजित केली. पण, अजित पवार यांचे आजचे पुढील कार्यक्रम नियोजित कार्यक्रम होते. त्यामुळे कालवा समितीच्या बैठकीला अजित पवार हे उपस्थित राहू शकले नाही. अशी माहिती समोर येत आहे. आता यावर अजित पवार नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.