Akurdi: अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत तरुणांच्या उद्योग, व्यावसायाला चालना – चंद्रकांत पाटील

पालकमंत्री यांच्या हस्ते लाभार्थ्यांना बीजभांडवलाचे वाटप

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने आर्थिकदृष्टया मागासलेल्या तरुणांना उद्योग, व्यावसायासाठी चालना देण्याचे काम होत आहे. त्यातून तरुणांनी चांगला व्यावसाय करून महामंडळाने दिलेले कर्ज मुदतीत फेडावे, असे आवाहन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा पुणे व सोलापूर कार्यालया अंतर्गत बिज भांडवल व अनुदान योजनेच्या प्रातिनिधिक स्वरूपात 9 लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या बिजभांडवल रक्कमेच्या धनादेशांचे वाटप आज (शुक्रवारी) पालकमंत्री पाटील यांचे हस्ते आणि महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांच्या उपस्थितीत केले. आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड प्राधिकरण कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

  • यावेळी राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिलीप खुडे, शिवाजी मांजरे, एन.एम. वाघमारे, एल. ए. क्षीरसागर यांच्यासह जिल्हा व्यवस्थापक महामंडळाचे कर्मचारी, लाभार्थी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.