Talegaon : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दक्ष रहा – अमरनाथ वाघमोडे

तळेगाव पोलीस आणि महिला दक्षता समितीची बैठक

एमपीसी न्यूज – शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी पोलिसांना मदत करावी. तसेच शहरातील विविध महाविद्यालयामध्ये जाऊन मुलींना कायद्याविषयी माहिती द्यावी. तसेच अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन तळेगाव दाभाडे पोलिसांकडून करण्यात आले.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 5) महिला दक्षता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, महिला दक्षता समितीच्या ज्योती जाधव, मोहिनी भेगडे, उषा खोल्लंम, आशालता चोरगे, शोभा भेगडे, अनिता भेगडे, चारुशीला काटे, अनिता दाभाडे, मंगल मु-हे, अंजली जोगळेकर, सविता मंचरे, वंदना तरस, विना शिंदे, विजया भंडलकर, सुमित्रा जाधव, निकिता घोटकुले, शोभा परदेशी, मीरा फल्ले
वैशाली प्रमोद दाभाडे, माया तुषार भेगडे, निशा वैभव पवार, अर्चना काटे, वंदना केमसे आदी उपस्थित होते. रजनी ठाकूर यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे म्हणाले, “महिला दक्षता समितीच्या सदस्य महिलांनी तळेगाव शहर आणि परिसरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये भेट द्यायला हवी. तिथल्या मुलींना कायद्याचे ज्ञान देऊन त्यांना सक्षम बनवावे. शाळा महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रशासनाला सांगावे. त्याचा पाठपुरावा करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण करून घ्यावे. तसेच काही गैरप्रकार आढळत असेल तर अशा बाबींची माहिती तात्काळ पोलिसांना द्या.”

येत्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु होत आहेत. या काळात देखील महिला दक्षता समितीने दक्ष राहायला हवे. निवडणूक काळात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांची मोलाची मदत होणार आहे, असेही वाघमोडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.