Talegaon Dabhade : तळेगाव येथील रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दिनेश मेहता यांचे अपघाती निधन

एमपीसी न्यूज –  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील जेष्ठ स्वयंसेवक दिनेश कृष्णदास मेहता  (वय 82) यांचे आज (सोमवारी) पहाटे अपघाती निधन झाले. 

हा अपघात तळेगाव येथील खांडगे पेट्रोलपंपासमोर आज पहाटे पावणेसहाच्या सुमारास घडला. मेहता हे त्यांच्या टीव्हीएस स्कूटी वरून तळेगाव बाजारपेठेकडे जात होते यावेळी एका खाजगी बसने (एमएच14 सीडब्ल्यू4689) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने मेहता यांचे निधन झाले. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात बस चालकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Wakad News: राहुल कलाटे आयोजित दीपोत्सव विशेष भव्य रांगोळी स्पर्धेत हर्षा देशमुख प्रथम

दिनेश मेहता हे श्री बालाजी मंदिर ट्रस्ट तळेगावचे ट्रस्टी गट्टूलाल मेहता यांचे छोटे बंधू तसेच चंद्रशेखर व भूषण मेहता यांचे वडील होते. ते राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे ज्येष्ठ स्वंयसेवक म्हणून ही त्यांची ओळख होती. त्यांच्या आकस्मित निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.