Akurdi : शिवसेनेकडून खंडोबा मंदिरात स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज –  भारताचे  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी  केलेल्या ( Akurdi) आवाहनाला  प्रतिसाद देत स्वच्छ तीर्थ अभियान या कार्यक्रम अंतर्गत आकुर्डी येथील देवस्थान श्री खंडोबा मंदिरात  स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  तसेच मावळचे खासदार  श्रीरंग  बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, ज्येष्ठ नेते  दिलीप  पांढरकर, माजी नगरसेवक निलेश पांढरकर, राष्ट्रवादीचे विशाल  काळभोर, शैलाताई निकम, अनिताताई खेडेकर,सय्यद पटेल, हर्षवर्धन पांढरकर,  बाबुलाल वाघमारे ,  रामभाऊ सुपेकर, हरिभाऊ डोबाळे, तुकाराम कांचन, हेमचंद्र जावळे, बाळकृष्ण चिले तसेच आरोग्य अधिकारी राजू सावळे, भूषण शिंदे  तसेच महापालिकेतील कर्मचारी आदी  उपस्थित होते. मंदिर परिसर व खंडेराया चरणी सर्वांनी आज ( Akurdi) स्वच्छता केली .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.