Akurdi : रामकृष्ण मोरे महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील (Akurdi) रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कुटे, कार्याध्यक्ष पदी दत्तात्रय भालेकर तर उपाध्यक्ष पदी साधना बोरकर,  ॲड. नितीन मोरे यांची निवड करण्यात आली.

रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची सभा नुकतीच पार पडली. यामध्ये माजी विद्यार्थी संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर कुटे, कार्याध्यक्ष पदी दत्तात्रय भालेकर, उपाध्यक्ष पदी साधना बोरकर व ॲड. नितीन मोरे, सचिव पदी विजय लांडगे, खजिनदार पदी सचिन इंदुरे, सहखजिनदार पदी राहूल घोलप, सहसचिव पदी ॲड सतिश परदेशी यांची निवड झाली.

Maharashtra News : परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास कुलगुरु जबाबदार

कार्यकारिणी सदस्यपदी रघुवीर शेलार, अनिता गाडेकर, अमित सूर्यवंशी, श्रीराम पवार, रोहिणी जाधव, विजय भेगडे यांची व विश्वस्तपदी नाना शिवले, विशाल काळभोर, दत्तात्रय भालेकर आणि निलेश पांढरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ही कार्यकारिणी पुढील पाच वर्ष काम करणार आहे.

प्राचार्य (Akurdi) डॉ. मनोहर चासकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. विशाल काळभोर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.