Pimpri : पिंपरी कॅम्प परिसरात रात्रीपासून बत्तीगुल

एमपीसी न्यूज – पिंपरी (Pimpri) कॅम्पमधील वैष्णवी देवी मंदिर परिसरातील विजपुरवठा मध्यरात्रीपासून खंडित झाला आहे. उकाडा वाढल्याने हैराण झालेल्या नागरिकांना विजपुरवठा खंडित झाल्याने अधिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

स्थानिक रहिवासी राहुल कुकरेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी देवी मंदिराजवळ सी ब्लॉक येथील वीजपुरवठा मंगळवारी (दि. 16) मध्यरात्री दोन वाजल्या पासून खंडित झाला आहे. याबाबत महावितरणला माहिती दिली असता महावितरण कडून नेमके कारण तसेच विजपुरवठा सुरळीत होण्याबाबत नेमकी माहिती दिली जात नाही.”

सी ब्लॉक येथे वीजपुरवठा करणारी केबल नादुरुस्त असल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. केबल दुरुस्तीचे काम सुरु आहे. मंगळवारी दुपारपर्यंत विजपुरवठा सुरळीत होईल, असे महावितरण कडून सांगण्यात आले.

Akurdi : रामकृष्ण मोरे महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर

पिंपरी-कॅम्प हा शहराचा (Pimpri) मध्यवर्ती भाग आहे. याच परिसरात शहरातील मोठी बाजारपेठ आहे. दाट लोकवस्तीचा परिसर म्हणूनही या भागाची ओळख आहे. अचानक विजपुरवठा खंडित झाल्याने रहिवासी नागरिकांसाठी व्यावसायिक दुकानदार यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.