Akurdi : पुणे, पिंपरी-चिंचवडला ड्रग्जचा विळखा; ड्रग्जच्या कारवाईत हयगय करू नका – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात ड्रग्जचे प्रमाण भयंकर वाढत चालले आहे. ड्रग्जवाले (Akurdi ) तरुण मुला, मुलींना अक्षरशः खात आहेत. त्यामुळे  ड्रग्जच्या कारवाई कोणतीही हयगय करू नका, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना दिली.

Charholi : श्रावणी सोमवारनिमित्त श्री वाघेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पाच वर्षांचा मागोवा घेणाऱ्या आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन आणि  राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सत्कार समारंभात पालकमंत्री पाटील बोलत होते.

खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखले पाहिजेत. दामिनी पथक अतिशय सक्षम आहे. पथकाला अधिकार, दुचाकी, चारचाकी वाहने द्यावीत. या दोन गोष्टीवर लक्ष द्यावे. पोलिसांना चांगले म्हणणे,  त्यांचा सत्कार करणे हे फार कमी असते.

पोलिसांचा सत्कार करून त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. तेही माणूसच आहेत. त्यांची स्तुती केली (Akurdi ) पाहिजे. त्यामुळे त्यांचा हौसला वाढेल. पोलीस आयुक्तांची 26 वर्षे सेवा झाली आहे. पुढील सेवेसाठी शुभेच्छा आणि पोलीस आयुक्त दोन वर्षे येथेच राहतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.