Akurdi : वेश्याव्यवसाय प्रकरणी आकुर्डीतील स्पा सेंटरवर छापा दोन पीडितांची सुटका

एमपीसी न्यूज- स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या (Akurdi)तिघांवर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.23) आकुर्डी येथील गणेश व्हिजन मॉल येथील ब्लू स्टोन्स स्पा येथे करण्यात आली.

या कारवाई मध्ये पोलिसांनी राकेश शिंदे (वय 25 रा. दापोडी) अक्षय बनकर (वय 30 ) व एक महिला आरोपी यांना अटक केली आहे तर दोन पिढी त्यांची यातून सुटका केली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे पोलीस हवालदार सुनील शिरसाट यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Hinjawadi : लग्नासाठी दमदाटी करत तरुणीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे आकुर्डी(Akurdi) येथील गणेश व्हिजन मॉल येथे ब्लू स्टोन्स पहा नावाने स्पा सेंटर चालवत होते. मात्र ते स्पा सेंटरच्या नावाखाली पीडितांकडून पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेत होते. याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई करत पीडितांची सुटका केली.

तेथून 3 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.