Khed : घर खरेदीच्या व्यवहारात नागरिकाची 26 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज : घर खरेदीच्या व्यवहारात एका (Khed) नागरिकाचे घरमालकाने तब्बल 26 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक 12 जून ते 2 सप्टेंबर 2023 या कालावधीत खेड येथील खराबवाडी येथे घडली.

याप्रकरणी उमाकांत सोमनाथ पाटील (वय 39, रा. नाणेकर वाडी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी महेश शामराव गुरव (वय 40, रा.खराबवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये फ्लॅट खरेदीचा 31 लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता. यानुसार फिर्यादी यांनी आरोपीला चेकद्वारे एकदा 18 लाख व नंतर 13 लाख रुपये दिले. यावेळी आरोपीने फ्लॅटवर 13 लाख रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितले होते.

Kasarwadi : भर दिवसा हत्याराने वार करत एकाचा खून ; दोघांना अटक

फिर्यादीने दिलेल्या रकमेतून ते कर्ज भरून टाकणार असल्याचे फिर्यादी त्यांना सांगितले. मात्र प्रत्यक्षात आरोपीने कर्ज न फेडता ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. यावेळी फिर्यादी यांनी त्याला विचारणा केली असता हा फ्लॅट तुम्हाला विकणे मला परवडत (Khed) नसल्याचे सांगून आरोपीने तो फ्लॅट दुसऱ्या इसमास विकून टाकला. याबाबत फिर्यादी यांनी त्यांची रक्कम परत मागितली असता आरोपीने केवळ 4 लाख 40 हजार रुपये फिर्यादी यांना परत करून त्यांची 26 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.