Alandi Chain Snatching: महिलेचे दिड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – पायी जाणा-या महिलेचे चोरट्यांनी दिड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. ही घटना रविवारी (दि. 10) रात्री पावणे दहा वाजता देहूफाटा आळंदी येथे घडली. (Alandi Chain Snatching) याप्रकरणी महिलेने दोन चोरट्यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Wakad Fraud Case: व्यवसायाच्या बहाण्याने 37 लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देहूफाटा आळंदी येथून पायी जात होत्या. दरम्यान त्यांच्या मागून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळयातील 60 हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. त्यांनतर चोरटे चाकणच्या दिशेने निघून गेले. दिघी पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.