Alandi : आळंदीमधील धर्मशाळेतून पाच मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – आळंदीमधील कोयना खोरा धर्मशाळेतून (Alandi) पाच मोबाईल फोन चोरीला गेले. ही घटना शुक्रवारी (दि. 2) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली आहे.

अक्षय उमाशंकर पाटील (वय 29, रा. आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विशाल पिंपळे (वय 23, रा. केळगाव, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोयना खोरा धर्मशाळेत राहतात. ते धर्मशाळेतील खोलीचा दरवाजा उघडा ठेवून झोपले असताना शुक्रवारी पहाटेच्या वेळी एका चोरट्याने चार्जिंगला लावलेले 56 हजार 500 रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन चोरून नेले.

Mulshi : घरफोडी करून सोन्याच्या बांगड्या पळवल्या

हा प्रकार शुक्रवारी सकाळी सात वाजता उघडकीस आला. पोलिसांनी या (Alandi) प्रकरणी तपास करून एका चोरट्याला अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.