Alandi : आळंदीत वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा मोफत 

एमपीसी न्युज – कार्तिकी वद्य एकादशी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची 723 व्या संजीवनी समाधी निमित्ताने आलेल्या सर्व वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा मोफत देण्यात आली. वैष्णव चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट आणि प्राधिकरण व्यापारी असोसिएशनच्यातर्फे मोफत वैद्यकीय सेवा दिली.

या सेवेत डाॅक्टर दिलीप सातव, डाॅ बच्छाव ,डाॅ अरुण काळे , डाॅ. काळे वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट चे विश्र्वस्त राम नलावडे आणि विजया कासुर्डे तथा पुणे जिल्हावारी व्यवस्थापन समिती पुण्याचे अध्यक्ष मुकेश सोमैय्या, रविकिरण डहाळे, संतोष नलावडे , अनंत महाडिक आणि प्रकाश सातव आदी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.