Alandi : आळंदीत अवकळी पावसाची जोरदार हजेरी

एमपीसी न्यूज : आळंदी येथे साडेआठच्या सुमारास अवकाळी पावसाने (Alandi) जोरदार हजेरी लावली.  आळंदीसह पंचक्रोशीतील गावांमध्येही वादळी वाऱ्यासह व ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस सुरू होता. आळंदीमधील रस्त्यावर सर्वत्र पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून येत होते.

Bhosari Crime News : महावितरणच्या अभियंत्यास धक्काबुक्की केल्याप्रकरणी आरोपीस तात्काळ अटक

सोसाट्याचा वारा व जोरदार पाऊस असल्याने शहरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. अचानक आलेल्या या पावसामुळे आळंदीकर नागरिकांची चांगलीच धांदळ उडाली. कामानिमित्त बाहेर पडलेले काही दुचाकी स्वार, पादचारी नागरिक या पावसामुळे भिजलेले दिसून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.