Today’s Horoscope 16 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 16 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – गुरूवार

16-03-2023

शुभाशुभ विचार – 10 नंतर चांगला दिवस.

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र- पूर्वाशाढा .

चंद्र राशी – धनु

—————————————-

आजचे राशिभविष्य

 

मेष – ( शुभ रंग- पांढरा )

कार्यक्षेत्रात आज डोक्याला ताप देणाऱ्या काही घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ जितके विचारतील तितकेच बोला. फार खोलात शिरलात तर तुमच्याच अडचणी वाढतील.

 

वृषभ (शुभ रंग- मरून)

कार्यक्षेत्रात नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आज दिवस तितकासा चांगला नाही. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. वैवाहिक जीवनात फार अपेक्षा नकोत, जे चाललंय ते बर चाललंय.

 

मिथुन ( शुभ रंग- निळा)

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच करा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. भागीदारीत देण्या घेण्याचे व्यवहार चोख असलेले बरे

 

कर्क (शुभ रंग- लाल.)

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामातील समर्पणाने वरिष्ठ प्रभावित होतील. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा विषयच नको. काही येणी असतील तर मागावी लागतील.

 

सिंह (शुभ रंग- पिस्ता )

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ लाभेल. दुपारनंतर काही बिकट प्रश्न सहजच सुटतील. असाध्य आजारावर डॉक्टरांना अचूक उपाय सापडेल.

 

कन्या ( शुभ रंग- मोतिया)

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर तुम्ही ठाम राहणार आहात. स्थावरची खरेदी विक्री फायद्यात राहील. गृहिणी घर सजावटीस आज प्राधान्य देतील.

 

Alandi : आळंदीत अवकळी पावसाची जोरदार हजेरी

 

तूळ ( शुभ रंग- डाळिंबी)

नवीन व्यावसायिकांनी मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आत्मविश्वास हा नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. घराबाहेर वावरताना रागावर ताबा ठेवा.

 

वृश्चिक (शुभ रंग- मरून)

आज आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उद्भवला तरीही पैशाची कमतरता भासणार नाही. आज कदाचित दंत वैद्याची भेट घ्यावी लागेल.

 

धनु- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज नोकरीच्या ठिकाणी काही मनासारख्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. इतरांच्या भानगडीत डोकावण्याची गरज नाही.

 

मकर ( शुभ रंग- गुलाबी)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. ज्येष्ठांना मनःशांतीसाठी सत्संगा शिवाय दुसरा पर्याय नाही.

 

कुंभ (शुभ रंग – निळा)

नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालूनच येतील. आज सकारात्मक दृष्टिकोन बाळगून कामाला लागा. मोठ्या भावाचे सल्ले विचारात घ्या.

 

मीन -(शुभ रंग – जांभळा )

आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणार आहात. इतरांच्या कामासाठी आपल्या अधिकारांचा वापर कराल. आज काही रखडलेली शासकीय कामे गती घेतील..

 

    शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क   9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.