Bhosari Crime News : महावितरणच्या अभियंत्यास धक्काबुक्की केल्याप्रकरणी आरोपीस तात्काळ अटक

एमपीसी न्यूज – वीजबिलांच्या थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित केलेल्या विद्युत (Bhosari Crime News ) जोडणीची तपासणी करीत असताना महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीसांनी आरोपी रमेश थोरात यास तात्काळ अटक केली आहे. त्यानंतर मा. न्यायालयाने या आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी की, भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. उदय भोसले, सहायक अभियंता रमेश सूळ, वरीष्ठ तंत्रज्ञ सुहास ढेंगळे हे मोशी प्राधीकरणमध्ये रविवारी (दि. 12 ) दुपारी अडीचच्या सुमारास वीजबिलांच्या थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या वीजजोडणीची तपासणी करीत होते. यामध्ये आशियाना बिल्डिंगमध्ये कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही एका फ्लॅटमध्ये वीजवापर सुरु असल्याचे आढळून आले.

 

Pune Rain : पिंपरीमध्ये नागरिकांनी अनुभवला गारपीटांचा पाऊस; तर पुण्यात ‘या’ भागात अजूनही मुसळधार पावसाची शक्यता

 

यासंदर्भात पुढील कारवाई करण्यासाठी वीजपुरवठा खंडित केला असता कोणाच्या आदेशाने वीजपुरवठा खंडित केला असे म्हणत रमेश बाबूराव थोरात (वय ४७, रा. आशियाना बिल्डिंग, सेक्टर 4, मोशी) नामक व्यक्तीने कार्यकारी अभियंता श्री. भोसले यांना धक्काबुक्की केली व अरेरावीची भाषा वापरली. तसेच सहायक अभियंता श्री. सूळ यांच्या चारचाकी वाहनाची हवा सोडली.
या प्रकरणी कार्यकारी अभियंता श्री. भोसले यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Bhosari Crime News ) तक्रार दाखल करताच पोलिसांनी वेगवान कारवाई करीत आरोपी रमेश थोरात याच्याविरुद्ध भादंवि कलम 353, 323, 504 अन्वये गुन्हा दाखल करून त्यास तात्काळ अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.