Pune Rain : पिंपरीमध्ये नागरिकांनी अनुभवला गारपीटांचा पाऊस; तर पुण्यात ‘या’ भागात अजूनही मुसळधार पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज : काही वेळापूर्वीच हवामान खात्याने (Pune Rain) अंदाज वर्तवल्याप्रमाणे पुणे शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. तर, पिंपरीमधील नेहरूनगरमध्ये काही वेळापूर्ती नागरिकांना गारपीटांचा पाऊस अनुभवयाला मिळाला. पुण्याच्या बाहेरील दक्षिण भागात वादळ सुरू असल्याने पुढील 2 तासांत पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात आणखी वादळ येण्याची शक्यता अजूनही वर्तवण्यात आली आहे. 

यासोबतच पुण्यातील आळंदी, धानोरी, चिंबळी, भिवडी परिसरात रात्री मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर,  हिंजवडी, तळेगाव, बाणेर, औंध येथे रात्री 9 नंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नसून केवळ गडगडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे.

Maval : मावळमधील सात शाळांच्या मूलभूत सुविधा विकास कार्यक्रमाचा शुभारंभ

प्रामुख्याने सध्या दक्षिण, नैऋत्य, मध्य आणि पूर्व पुणे शहराच्या काही भागात गडगडाट सुरू आहे. आता पुणे शहर, पेठ भागात पाऊस ओसरला आहे. पुणे शहराच्या पूर्व भागात रात्री 9 दरम्यान काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. चाकण परिसरातही पुढील अर्ध्या तासात जोरदार वादळी पावसाची (Pune Rain) शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.