Pune Rain : पुण्यामध्ये 29 नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज : आज राज्यात मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये (Pune Rain) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या तिन्ही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुण्यामध्ये 29 नोव्हेंबर पर्यंत पावसाची शक्यता असल्याचे मत यांनी मांडले आहे. आज संध्याकाळीही पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 1 डिसेंबरपर्यंत बंगालच्या उपसागरात हंगामातील तिसरे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या अनुकूल MJO आणि महासागर परिस्थितीमुळे ही प्रणाली श्रेणी 2/3 चक्रीवादळपर्यंत तीव्र होऊ शकते. या प्रणालीचा ट्रॅक अजूनही अनिश्चित आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

काल संध्याकाळ पासून पुण्यातील काही भागात पाऊस झाला. पुण्यातील आंबेगाव, भोर,अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, खडकवाडी, धामणी, लोणी, वाळुंजनगर, रानमळा, लाखणगाव, काठापुर बुद्रुक,मांदळेवाडी, वडगापीर, शीरदाळे या भागांमध्ये गारपिटसह पाऊस झाला.

पुढील प्रमाणे पावसाची नोंद (मिमी) Pune Rain

बिबवेवाडी (प्रा.): 21 मिमी
एनडीए: 18 मिमी
हडपसर : 17 मिमी
चिंचवड : 12 मिमी
लव्हाळे : 8 मिमी
पाषाण : 7 मिमी
दौंड ते आळंदी : 6 मिमी
शिवाजीनगर IMD आणि वडगाव शेरी: 5 मिमी
कोरेगाव पार्क : 4 मिमी

Pimpri : रसिकांच्या पसंतीशिवाय गझल अपूर्ण असते – डॉ. शिवाजी काळे

डिंबेडॅम : 46 मिमी
जुन्नर  : 44 मिमी
वेल्हे : 43मिमी
आंबेगाव : 40 मिमी
गिरीवन : 39 मिमी
खंडाळा : 38 मिमी
नारायणगाव : 33 मिमी
वेताळे : 32 मिमी

चिलेवाडी (जुन्नर) : 148 मिमी
निमगिरी आणि चासकमान : 67 मिमी
औंढे (राजगुरुनगर) : 63 मिमी
कुंभेरी (मुळशी) : 58 मिमी
खिरेश्वर (जुन्नर) : 54 मिमी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.