Alandi : मंगेश पाटील यांनी अनाथाश्रमात जाऊन केला वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज- युवा सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी येथील स्नेहवन या अनाथ आश्रमात जाऊन तेथील मुलांना फळवाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.

आत्महत्या केलेल्या पालकांच्या मुलांचा सांभाळ या अनाथाश्रमात केला जातो. या आश्रमात 60 मुले आहेत. मंगेश पाटील यांच्या सोबत माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, राहुल शिंदे सर उपस्थित होते. आश्रमाचे संस्थापक अशोक देशमाने हे आय टी इंजिनिअर होते परंतु नोकरी सोडून ते या मुलांसोबत राहतात. या मुलांना मोठे करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. मंगेश पाटील हे श्री स्वामी समर्थ महाराज मंदिराचे विश्वस्त असून नारायण बहिरवाडे यांच्या सोबत सामाजिक कार्यात मदत करतात.

प्रत्येकाने आपला वाढदिवस एखाद्या अनाथ आश्रमात जाऊन साजरा करायला हवा अशी भावना मंगेश पाटील यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.