Alandi News : इंद्रायणी नदीपात्र पुन्हा रसायनयुक्त पाण्याने फेसाळले

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पालिका हद्दीतून  तसेच इंद्रायणी नदी  काठच्या गावातून,कारखान्यातून इंद्रायणी नदीत मैलामिश्रित रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न (Alandi News ) करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडत असल्याने आज आळंदी येथील नदीपात्र रसायनयुक्त सांडपाण्यामुळे पुन्हा फेसाळले होते.

 

 

इंद्रायणी फाऊंडेशन च्या वतीने विठ्ठल शिंदे तसेच वारकरी संप्रदायातील विठ्ठल महाराज यांनी केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदीपात्र पुन्हा प्रदूषित झाल्याने नाराजी व्यक्त केली. नदीपात्रातील या केमिकल युक्त दूषित पाण्याने जर भाविकांनी स्नान केले तर त्वचा रोग उदभवू शकतात.

काही नागरिकांना त्वचा रोग झाल्याचे ही यावेळी शिंदे यांनी सांगितले.  (Alandi News )  इंद्रायणी नदी मध्ये कंपन्यांनी केमिकल युक्त सांडपाणी थेट सोडू नये यासाठी शासनाने योग्य ती उपाय योजना करावी.अशी मागणी यावेळी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.