Pune News : कसबा पेठ मतदारसंघात आतापर्यंत 28 लाख रुपये भरारी पथकाकडून ताब्यात

एमपीसी न्यूज – कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रशासनाने 13 हजार 542 वाहनांची तपासणी केली असून नाके तपासणी व भरारी पथकांच्या तपासणीत एकूण पाच घटनांमध्ये 28 लाख 18 हजार 500 इतकी रक्कम ताब्यात (Pune News) घेण्यात आली आहे. ही रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूकीच्या प्रचारास शुक्रवार सायंकाळी 6 वाजेपासून प्रतिबंध आहेत.  पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असून नाके तपासणी आणखी कडक करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Alandi News : इंद्रायणी नदीपात्र पुन्हा रसायनयुक्त पाण्याने फेसाळले

प्रचार समाप्ती नंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, असे कसबा पेठ (Pune News) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.