Today’s Horoscope 25 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 25 February 2023
वार – शनिवार.
25.02.2023
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – भरणी.
चंद्र राशी – मेष.
—————————————-
मेष (शुभ रंग- राखाडी)
आज तुम्ही हट्टीपणाने वागाल. सडेतोड बोलल्याने आपलीच काही माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक आवक आज सांगली असली तरीही पैशाची अनावश्यक उधळपट्टी करू नका.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता )
विविध मार्गाने येणारा पैसा आज विविध मार्गाने जाईल दूरच्या प्रवासात आपल्या किमती वस्तू सांभाळा घरात पूर्वी हरवलेली वस्तू आज संध्याकाळी सापडू शकेल.

मिथुन (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. मित्र दिलेली आश्वासने पाळतील. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार दिवसाच्या पूर्वार्धातच उरकणे गरजेचे आहे.

कर्क (शुभ रंग- पांढरा)
उच्चशिक्षितांना आज मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील निर्णय घ्यायला मात्र विलंब लावू नका. आज मित्र तुम्हाला दिलेला शब्द पाळतील. छान दिवस आहे.

सिंह (शुभ रंग- मरून)
ऑफिसमध्ये अधिकारी वर्गास काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अविश्रांत मेहनतीच्या जोरावर आज ध्येयाकडे तुम्ही वेगाने वाटचाल कराल. कायद्याची चौकट मात्र मोडू नका.

कन्या ( शुभ रंग- हिरवा)
कार्यक्षेत्रात घडलेल्या काही मनाविरुद्ध गोष्टींनी तुम्हाला नैराश्य येण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी नमते घ्या व सहकारी वर्गाशी जुळवून घ्या. मित्रांना आज दुरूनच रामराम करा.

तूळ (शुभ रंग- भगवा) – Today’s Horoscope 25 February 2023
आज तुम्ही आपल्या मर्यादेत रहा. अति आक्रमकतेने नुकसान होईल. संध्याकाळी वाहन चालवताना जरा जपून. मुलांनी कुसंगती पासून लांब राहावे. पालक हिताचेच सल्ले देतील.

वृश्चिक (शुभ रंग- आकाशी)
कार्यक्षेत्रात आज काही आव्हान देणारे तेच प्रसंग सोडवावे लागतील. वैवाहिक जीवनात सौम्य तणाव संभवतात. भागीदारीत व्यवहार लिखित स्वरूपात ठेवा.

धनु (शुभ रंग- आकाशी)
महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. आज रुग्णांना असाध्य आजारावर योग्य उपाय सापडतील. मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून आनंदी व्हाल.

मकर (शुभ रंग- मोरपंखी)
आज तुम्हाला तुमची खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. हाती असलेल्या पैसा आज जपून वापरा. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊन बसू नका. मुलांचे अति लाड थांबवा.

कुंभ (शुभ रंग – भगवा)
नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अथक श्रमांचे फळ मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांना लोकप्रियता मिळेल. कुटुंबीयांस अभिमानास्पद वाटणारी अशी एखादी कामगिरी तुमच्या हातून घडेल.

मीन (शुभ रंग – मोतिया)
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. आज लहान भावास कदाचित तुमच्या मदतीची गरज लागणार आहे.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Chinchwad Bye Election : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, शेवटच्या दिवशी रॅली, गाठीभेटींवर उमेदवारांचा भर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.