Alandi news : सिध्दबेटा मध्ये केळगांव ग्रामस्थांच्या वतीने जीर्णोद्धार

एमपीसी न्यूज : संत निवृत्तीनाथ ,संत ज्ञानदेव, संत सोपानदेव, संत मुक्ताई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत तसेच त्यांच्या वास्तव्य ,लिलाभूमीत म्हणजेच सिद्धबेट येथे (Alandi news) केळगाव ग्रामस्थांच्या वतीने माऊलींच्या वास्तव्य, लिलाभूमी पर्णकुटी समोर ऊन,वारा ,पाऊस यांपासून भाविकांचे संरक्षण व्हावे तसेच भाविकांच्या विविध सोयी सुविधे करीता येथे नव्याने पत्रा शेड सिमेंटच्या ओट्याचे काम करण्यात आले आहे.

ACB action : मेदनकरवाडीच्या ग्रामसेवकाला पाच हजाराची लाच घेताना अटक

येथील देवांच्या मूर्तीस साजेसे असे नव्याने रंग देण्यात आले आहेत. येथील भिंतीवर फुलदाणीचे नक्षीकाम करण्यात आले आहे.देवांच्या ओट्यावर नव्याने फरशी बसविण्यात आली आहे.(Alandi news) व या पर्णकुटी समोर गुलाब ,जास्वंद ,आंबे अश्या विविध प्रकारच्या फुल ,फळ, झाडांची, आकर्षक अशी बाग करण्यात आली आहे.विशेषतः या बागेत गुलाबांची मोठ्या प्रमाणात उमलेली फुले नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.पूर्णकुटी समोरील परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.