Two wheeler theft : पिंपळे गुरव व भोसरी येथून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज पिंपळे गुरव व भोसरी येथून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. (Two wheeler theft) याप्रकरणी गुरुवारी (दि.13) सांगवी व भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

पिंपळे गुरव येथील मोहम्मद अकबर अली (वय30 रा. पिंपळे गुरव) यांची बुधवारी (दि.12) पार्कींगमध्ये पार्क केलेली डी.ओ. (एमएच12 एचएन0366) ही 10 हजार रुपयांची दुचाकी चोरून नेली आहे.(Two wheeler theft) यावरून सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढिल तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Alandi news : सिध्दबेटा मध्ये केळगांव ग्रामस्थांच्या वतीने जीर्णोद्धार

भोसरी येथील गव्हाणे वस्ती येथे फिर्यादी अजित हनुमंत थोरवे (वय33 रा.जुन्नर) यांनी पार्क केलेली (एमएच14 इ ए 1977) 25 हजार रुपयांची दुचाकी अज्ञाताने हँडल लॉक तोडून चोरून नेली.(Two wheeler theft) याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.