Alandi : भगवान महाराज कोकरे यांच्या उपोषणाची प्रशासकीय पातळीवर दखल

एमपीसी न्यूज – आळंदी येथील (Alandi) इंद्रायणी नदी घाटावरती (हवेली विभाग) ह. भ. प. भगवान महाराज कोकरे  यांनी दि. 1 नोव्हेंबर पासून भव्य राष्ट्र कल्याण सामुदायिक जन आंदोलन आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा  सातवा दिवस  आहे. या उपोषणाची दखल प्रशासकीय पातळीवर घेतली असून आज ( दि.7 रोजी)  उपोषण स्थळी तहसीलदार  अर्चना निकम  ,मुख्याधिकारी कैलास केंद्रे व गोसेवा आयोगाचे शेखर मुंदडा यांनी भगवान महाराज कोकरे यांच्या सोबत संबंधित मागण्या संदर्भात चर्चा केली.

 

तसेच वरीष्ठ कार्यालय व मंत्रालयापर्यंत त्यांच्या मागण्यांची माहिती दिली जाईल,  अशी ग्वाही संजय बालवडकर यांनी दिली. यावेळी वारकरी संपर्क प्रमुख जालिंदर महाराज काळोखे पाटील, नरहरी महाराज चौधरी, माऊली गो शाळा संस्थेचे संस्थापक गणेश हुलावळे, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रकाश तात्या बालवडकर, महंत भोलापुरे महाराज, मधुसूदन रांजळेकर(शास्त्री)महाराज, संजय पांडे व इतर मान्यवर उपस्थित होते .

 

तसेच काल अक्षय महाराज भोसले यांनी भगवान महाराज कोकरे यांच्या उपोषण स्थळी भेट देऊन प्रशासनास संबंधित विषयांवर माहिती देणार असल्याचे (Alandi) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.