Alandi : नोकरीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सेवेची संधी मिळाली – कैलास केंद्रे

एमपीसी न्यूज – आळंदीचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी (Alandi ) सोहळ्यात सहभाग घेतला.याविषयी बोलताना ते म्हणाले,हा खूप छान अनुभव होता. या संपूर्ण वारीच्या सोहळ्याचे आम्हा मराठवाड्यातील नागरिकांना  विलक्षण आकर्षण आहे.

वारीसाठी गावातून निघणाऱ्या लोकांना निरोप देण्यासाठी सर्व गाव जमत असे, तसेच वारी पूर्ण करून आलेल्यांचे अत्यंत भक्ती भावाने दर्शन घेतल जात असे;अगदी लहापणापासून हे पाहत मी वाढलो. परंतु प्रत्यक्ष कधी वारीत सामील होण्याची संधी मिळाली नाही. पण आळंदीमधील नोकरीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सेवेची संधी मिळाली.
मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी वारकरी वेश धारण करून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी (Alandi ) सोहळ्यात सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.